Wednesday, January 7, 2026
Homeनाशिकदुर्दैवी : शेततळ्यात पडून बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : शेततळ्यात पडून बालकाचा मृत्यू

खडकमाळेगाव । वार्ताहर Khadakmalegaon

खडकमाळेगाव येथे मामाच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टयानिमित्त सातपूर नाशिक येथून आलेला युवराज मंगेश कोकाटे या दहा वर्षीय मुलाचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, युवराज कोकाटे हा उन्हाळ्याच्या सुट्टया घालवण्यासाठी मामा भास्कर नेटारे यांच्या घरी आला होता. गुरुवार (दि.5) जून रोजी सायंकाळी 6 वाजता मामी कावेरी भास्कर नेटारे यांना युवराजने मी खेळण्यासाठी बाहेर जात आहे, असे सांगितले व तो खेळण्यास गेला. परंतु बराच वेळ झाला तरी युवराज न आल्याने त्यांनी युवराजची शोधाशोध केली. परंतु युवराज त्यांना मिळून न आल्याने त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात युवराज हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

YouTube video player

त्याचा पोलीस व नातेवाईक शोध घेत असतानाच शुक्रवार (दि.6) जून दुपारी 2 वाजेदरम्यान दिगंबर गायकवाड या इसमास गावातील संजय गवळी यांच्या शेतातील शेततळ्यात युवराजचा मृतदेह पालथ्या स्थितीत पडलेला मिळून आला. त्यांनी लागलीच या घटनेची खबर पोलीस पाटील वैशाली बाजारे यांना दिली. खेळण्यासाठी गेलेल्या युवराजचा अशा पद्धतीने दुदैवी मृत्यू झाल्याने खडकमाळेगावसह सातपूर येथील कोकाटे परिवारावर दुःखाचे सावट पसरले होते.

लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आल्हाट अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...