Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू; दिंडोरीत ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन...

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू; दिंडोरीत ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन सुरु

 

दिंडोरी | प्रतिनिधी 

- Advertisement -

दिंडोरी येथे आज रात्री आठ वाजता जाधव वस्तीवर रुद्र अमोल जाधव (वय ४ वर्षे) यांचे आजोबा दत्तात्रय जाधव यांच्या बरोबर घरात जात असताना लपून बसलेल्या बिबट्याने रुद्रवर झडप घातली व त्याला दत्तात्रय जाधव यांच्या हातातून हिसकावून नेले. दोन तास शोध घेतल्यानंतर रुद्रचा तपास लागला.

जखमी अवस्थेत रुद्रला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयांत नेले असता डॉक्टरांनी रुद्रला मृत घोषित करण्यात आले. मागील महिन्यातच बिबट्याचा हल्ल्यात तरुण मुलीचा मृत्यू झाला होता, आणखी परत चालता बोलता बिबट्याने लहान बालकाला भक्ष केले आहे.

दरम्यान या घटनेने दिंडोरीतील सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी रास्ता रोको केला आहे. यात माजी आमदार धनराज महाले, आणि समीर हरिश्चंद्र चव्हाण, दिंडोरीतील अनेक नगरसेवक या रास्ता रोकोत सहभागी झाले आहेत. या मुळे नाशिक – सापुतारा मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : दरोड्याच्या तयारीत तिघे जेरबंद; दोघे पसार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळील आराध्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा,...