Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : विजेचा धक्का बसून पती-पत्नीचा मृत्यू

दुर्दैवी : विजेचा धक्का बसून पती-पत्नीचा मृत्यू

ओझे । वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथील २९ वर्षीय शेतकरी घराच्या छताला लोखंडी पाईपला फवारणी पंप बांधण्यास गेले होते पाईपमध्ये विजप्रवाह उतरला असल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यास गेल्लेल्या त्यांच्या पत्नीसही विजेचा धक्का बसून शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

नळवाडपाडा येथील साहेबराव चंदर महाले (29) हे वस्तीवर राहतात. गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने पाऊस सुरु असून गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाचे वेळी ते आपल्या घराचे पडवीचे छताचे लोखंडी पाईपला फवारणी पंप बांधण्यास गेले असता सदर पाईप मध्ये वीज प्रवाह उतरलेला होता. त्या विजेचा धक्का त्यास बसला. हे बघतच त्यांची पत्नी राणी (25) या त्यांना वाचवण्यास गेल्या असता त्यांनाही शॉक बसला नातेवाईकांनी त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

पावसामुळे घराची पडवी पूर्ण ओली असल्याने विजेचा तीव्र शॉक बसत त्यांना वाचण्याची संधी मिळाली नाही. सदर महिला सात महिन्याची गर्भवती होत्या . यात ते बालक ही मातेच्या गर्भात आईसोबत मयत झाले. या घटनेची दिंडोरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असताना पिकांवर रोग प्रारदुर्भाव टाळण्यासाठी शिकार पंप पाठीवर घेत फवारणी करणारे युवा दाम्पत्य फवारणी पंप सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास गेले अन दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात आई, भाऊ, एक चार वर्षाची तर एक अडीच वर्षाची मुलगी आहे.

आजी पप्पा मम्मी कधी येणार
या घटनेनंतर दोघांनाही दिंडोरी दवाखान्यात नेत्यात आले यावेळी चिमुकल्यांना सांगितले की पप्पा मम्मी दिंडोरीला गेले येतील आज पंचनामा करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक वीज कर्मचारी आले त्यावेळी चिमुकल्यांना वाटले आपले पप्पा मम्मी आले पण त्या गाडीत ते दिसले नाही चिमुकल्यांनी आजी ला विचारले पप्पा मम्मी कधी येणार हे ऐकताच सर्वांना गहिवरून येत सर्वांचेच डोळे पानावले.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...