Saturday, May 4, 2024
Homeनाशिकट्रेलरच्या उंचीची मर्यादा ११ फुटांवरुन १४ फुटावर

ट्रेलरच्या उंचीची मर्यादा ११ फुटांवरुन १४ फुटावर

नाशिक : यंत्रसामग्री वाहतूक करणाऱ्या ट्रेलरच्या उंचीची मर्यादा ११ फुटांवरुन १४ फुट करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज घेतला.

देशभरातील पायाभूत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री अनेक जिल्ह्यांतून वा राज्यांमधुन ने आण करण्यासाठी ट्रेलरचा वापर केला जातो. परंतु परिवहन विभागाच्या काही नियमांमुळे यंत्रसामग्री वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या होत्या व त्यामुळे आर्थिक नुकसान देखिल सोसावे लागत होते. म्हणून नाशिक येथील जिल्हा अर्थमुवर्स असोसिएशन व कोल्हापुर येथील जिल्हा असोसिएशन च्या प्रयत्नातून कोल्हापुर येथील खासदार प्रा मंडलीक यांचे मार्फत नितिन गड़करीकडे पाठपुरावा सुरु केला होता.

- Advertisement -

या संदर्भात नाशिक रिजनचे मुख्य रिजनल ऑफिसर भरत कळस्कर तसेच मा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देखिल निवेदन देण्यात आले होते. हा सुधारित कायदा देशभर लागू झाल्याने अवजड वाहन धारक व अवजड वाहन पुरविनारे ठेकेदार यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बांधकामासाठी उपयोगात आणले जाणारे ट्रेलर व तत्सम वाहनातून नेल्या जाणाऱ्या मालाला उंचीची मर्यादा ३.६ मिटर म्हणजे ११ फुट होती, मात्र इतर मालवाहतुक वाहनां पेक्षा उंचीला ही वाहने १ फुटापेक्षा जास्त असतात. त्यांची मानके आंतरराष्ट्रिय नियमानुसार ठरलेली असतात. अशा वाहनात कोणतेही बदल करता येत नाही. त्या मुळे अशा वाहनातून अवजड यंत्रसामग्री वाहतूक करतांना कित्तेक दशकापासुन मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत होता. या शिवाय हा दंड भरेपर्यंत वाहन थांबवुन ठेवले जात होते. पर्यायाने वाहतूक मालकांचा खोळंबा होत होता आणि याचा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास वाहन मालकांना सहन करवा लागत होता.

केंद्राकड़े या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्या बद्दल कोल्हापुर, नाशिक तसेच महाराष्ट्रातील सर्व अर्थमुवर्स व अवजड मालवाहतुकदार संघटनांनी खासदार प्रा. मंडलीक यांचे पत्रक देऊन आभार मानले. तसेच कोल्हापुर असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील व तेथील सर्व पदाधिकारी यांचे देखील आभार मानले.

यासाठी नाशिक जिल्हा असोसिएशन चे अध्यक्ष अब्बास मुजावर तथा पदाधिकारी योगेश बोहरा, नंदू कहार, योगेश नारंग, घनश्याम पाटिल, स्वप्निल मोहरिल, राकेश विजन, फरीद शेख इतर सर्वांनी मेहनत घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या