Thursday, September 10, 2026
Homeक्राईमTrambakeshwar: कडलगच्या मालमत्ता, संशयास्पद आर्थिक उलाढालींची झाडाझडती; भाविकांनी तक्रार दाखल करण्याचे एसआयटीचे...

Trambakeshwar: कडलगच्या मालमत्ता, संशयास्पद आर्थिक उलाढालींची झाडाझडती; भाविकांनी तक्रार दाखल करण्याचे एसआयटीचे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष तपास पथक नियुक्त केल्यावर अटकेतील संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग आणि त्याच्या पुतण्यांच्या आर्थिक व्यवहारांची बारीकसारीक तपासणी सुरू झाली आहे. एसआयटीने आता थेट बँकांकडे धाव घेतली असून, तिघांच्याही बँक खात्यांचे स्टेटमेंट आणि व्यवहारांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या रॅकेटने आतापर्यंत नेमकी किती कोटींची माया जमवली, याचा आकडा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. एसआयटी प्रमुख तथा त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथक कडलगच्या मालमत्तेची आणि गेल्या काही वर्षांतील संशयास्पद आर्थिक उलाढालींची चौकशी करत आहे. ८४ टक्के कमिशनचा हा काळा बाजार केवळ रोखीने चालत होता की यात डिजिटल व्यवहारांचाही समावेश आहे, हे बँक खात्यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होणार आहे. तसेच या तपासात पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या रॅकेटचा सर्वाधिक फटका परराज्यातील भाविकांना बसला आहे. लूट झालेले भाविक चौकशीचा ससेमिरा आणि पुन्हा नाशिकला येण्याचे सोपस्कार टाळण्यासाठी तक्रार देण्यास धजावत नसल्याचे समोर आले आहे. भाविकांनी अधिकृत तक्रारीसाठी पुढे न आल्यास कायदेशीर पुराव्यांची साखळी कमकुवत होऊ शकते, अशी शक्यता आहे. या तपासाने वेग घेतल्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील भ्रष्ट मध्यस्थांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

संपादकीय : १७ एप्रिल २०२६ – मायबोली सक्ती हा सन्मानच!

भाविकांना जाहीर आवाहन
ज्या भाविकांची अशाप्रकारे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय त्र्यंबकेश्वर पोलिसांशी किंवा एसआयटीशी संपर्क साधावा, असे आवाहन एसआयटी प्रमुख महेश कुलकर्णी यांनी केले आहे. भाविकांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली होती, हे सिद्ध करणे सोपे जाणार आहे.

या मुद्यांवर एसआयटीचा रोख
मंदिरात अधिकृत पावती नसताना भाविकांना कोणत्या दरवाजातून आणि कुणाच्या छुप्या मदतीने प्रवेश दिला जात होता?
केवळ कडलग कुटुंबच की यात मंदिर प्रशासनातील किंवा सुरक्षा यंत्रणेतील आणखी काही कर्मचाऱ्यांचे संगनमत आहे?
हे रॅकेट नेमके किती वर्षांपासून सुरू होते?
दरमहा सरासरी किती भाविकांना जाळ्यात ओढले जात होते आणि त्यातून जमा होणारी रक्कम कुठे खर्च केली जात होती?

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...