मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारने मंगळवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांची बदली पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवपदी झाली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया यांची बदली पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात झाली आहे.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांची नेमणूक झाली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग यांची बदली माहिती आणि तंत्रज्ञान विभागात करण्यात आली आहे. तर जलजीवन मिशनचे संचालक ई. रवींद्रन यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव म्हणून झाली आहे.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तनचे (स्मार्ट) प्रकल्प संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर यशदाच्या उप महासंचालक पवनीत कौर यांची बदली पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली आहे.





