Monday, July 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धोकादायक मालवाहतुकीला बंदी

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धोकादायक मालवाहतुकीला बंदी

महाराष्ट्र दिनी प्रकल्पाचे होणार लोकार्पण

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai
मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांची बचत करणाऱ्या मिसिंग लिंकवर धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांना द्रुतगती महामार्गाचा वापर करावा लागेल. तर मिसिंग लिंकवर बोगद्यामध्ये हलक्या वाहनासाठी ताशी १०० किमी तर बसेस आणि इतर प्रवासी वाहनासाठी ताशी ८० किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामहामंडळाने साडेदहा किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधला आहे. सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण येत्या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. हा प्रकल्प सुरु होत असताना वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सोमवारी मिसिंग लिंकवरील वाहतुकीबाबत अधिसूचना जारी केली.

दोन महिन्यापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन या ज्वलनशील वायूची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवर पूर्णतः बंदी घातली आहे.

मिसिंग लिंक अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत केवळ हलकी मोटार वाहने, बसेस आणि प्रवासी वाहने यांना मिसिंग लिंकचा वापर करता येईल. सहा महिन्यांच्या निरीक्षणाअंती मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...