Thursday, May 2, 2024
Homeनगरमोटारसायकलवरुन चंदनाच्या लाकडांची वाहतूक

मोटारसायकलवरुन चंदनाच्या लाकडांची वाहतूक

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवरुन चंदनाच्या लाकडांची वाहतूक करणार्‍या सोनईतील दोघांना सोनई पोलिसांनी पानेगाव ते सोनई रोडवर ताब्यात घेतले असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात चंदन चोरी व अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील एकनाथ ढोले यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 3 एप्रिल रोजी दुपाणी एक वाजता पानेगाव ते सोनई रोडवर चिमटा रोडवरील कॅनॉलच्या कडेला गणेश बाळू शिंदे (वय 29) रा. सोनई व माणिक राजाराम डुकरे (वय 40) रा. सोनई हे 40 हजार रुपये किंमतीची चंदनाची लहान-मोठी 20 किलो वजनाची सुंगधी लाकडे एका गोणीत भरुन हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरुन (एमएच 17 बीई 3039) बेकायदेशीरपणे चोरट्या पद्धतीने वाहतूक करुन अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने लाकडे जवळ बाळगून कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी सदर सुगंधी लाकडांची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मिळून आले. अंदाजे 40 हजार रुपये किमतीची चंदनाची 20 किलो लाकडे व 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 108/2022 भारतीय दंड विधान कलम 379 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 41(क), 42 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार ए. एम. दहिफळे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या