Sunday, February 9, 2025
Homeनगरउपचार घेणार्‍या तिघा जीबीएस संशयित रुग्णांची प्रकृती स्थिर

उपचार घेणार्‍या तिघा जीबीएस संशयित रुग्णांची प्रकृती स्थिर

राहुरी, नगर आणि आष्टीच्या रुग्णांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गुलीयन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) सदृश आजाराने पीडित तिघा रुग्णांवर नगरमधील एका बड्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असणार्‍या या तिघांची प्रकृती स्थिर असून संबंधित रुग्णांपैकी एक राहुरी तालुक्यातील, दुसरा नगर तालुक्यातील तर तिसरा आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. जीबीएस आजाराने पुण्यात थैमान घातले असून अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएस संशयित चार रुग्ण आढळल्याचे सोमवारी सांगण्यात आले. गुलीयन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजारात असणारी सर्व लक्षणे या रुग्णामध्ये दिसत असून आजाराच्या निदानासाठी विशेष चाचणी नसल्याने दिसणार्‍या लक्षणानुसार संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे वैद्यकीय परिभाषेत हा आजार नेमका कशामुळे होतो, याचे निश्चित करणार नसल्याने केवळ दिसणार्‍या लक्षणानुसार उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. नगर शहरात अद्याप जीबीएसचा स्थानिक रुग्ण आढळलेला नाही. सध्या उपचार घेणार्‍या रुग्णांपैकी एक रुग्ण राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील, नगर तालुक्यातील वाकोडी येथील तर तिसरा आष्टी येथील आहे. तिघांची प्रकृती आता स्थिर असून जिल्हा आरोग्य विभाग आणि मनपा आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवू नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या