Wednesday, September 11, 2024
Homeमुख्य बातम्यागिरीश बापट यांच्या निधनानंतर मान्यवरांकडून श्रद्धांजली

गिरीश बापट यांच्या निधनानंतर मान्यवरांकडून श्रद्धांजली

मुंबई | Mumbai

भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

- Advertisement -

गिरीश बापट यांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, ही अतिशय दुख:द बातमी आहे. आपण एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. गिरीश बापट हे गेली अनेक वर्ष सक्रीय राजकारणात होते. त्यांची कारकीर्द नगरसेवकापासून सुरू झाली. पुढे ते मंत्रीही आणि खासदारही झाले. मंत्रीमंडळात काम करताना आम्ही शेजारीच बसत होतो. त्यांच्या निधनाने भाजपाची तर हानी झालीच, पण आपण एक सच्चा लोकप्रतिनिधी गमावला आहे.

लढवय्या नेता हरपला! भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बापटांना ट्वीटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यात म्हटले की, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील बापट यांना ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला.

RSS चे स्वयंसेवक ते खासदार! अशी राहिली लढवय्ये गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सुद्धा बापट यांना ट्वीटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली असून त्यात म्हटले की, गिरीशजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीशजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गिरीश बापट यांना ट्वीटद्वारे श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजले! मतदान कधी? निकाल कधी?; वाचा एका क्लिकवर

कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी गिरीश बापट यांना ट्वीटद्वारे श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन सर्व पक्षातील नेत्यांशी मैत्रीचे संबंध असणारे गिराशजी सन्मित्र म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्व बापट कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या