त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ बाजून २ मिनिटांनी कुशावर्त तीर्थ येथे धर्मध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यास दक्षिण शृंगेरी शारदा पीठाचे जगदुरू शंकराचार्य श्री श्री विघुशेखर भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि दहा आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. या ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाची नांदी जगभरात पोहोचणार आहे.
असे आहे ध्वजाचे धार्मिक महत्व
यापूर्वी धर्मध्वजस्तंभाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पितळेच्या धातूपासून तयार करण्यात आलेल्या या स्तंभावर पताकेसारखा धर्मध्वज विराजमान होणार आहे. ध्वजावरील विविध देवता, शुभचिन्हे आणि त्यांचे धार्मिक महत्त्व हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. धर्मध्वजावरील शुभचिन्हांचे महत्व धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ओंकार, स्वस्तिक, ही आणि दशदिशा यांसारखी प्रतीके आहेत. सूर्य आणि चंद्र ही अमृतकुंभाच्या रक्षणाशी संबंधित प्रतीक मानली जातात. बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश हा सिंहस्थाच्या कालचक्राशी जोडलेला आहे, तर सिंह हे सिंह राशीचे प्रतीक आणि गुरूचे वाहन मानले जाते. मगर है गोदावरी नदीशी संबंधित प्रतीक असून, त्यातून त्र्यंबकेश्वरच्या तीर्थपरंपरेचा संदर्भ व्यक्त होतो.
ओंकार हे पवित्र आणि आध्यात्मिक मंगलचिन्ह, तर स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. इहीफ हे वैश्विक चेतना, माया आणि सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. दशदिशांचे चिन्ह सर्व दिशांची व्यापकता दर्शवते. ध्वजाच्या शेवटी असलेल्या १२ घंठ्या राशी आणि बृहस्पतीच्या भ्रमणचक्राशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार ध्वजारोहण
मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनीता पवार, मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, उदय सामंत, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार सुहास कांदे, आमदार हिरामण खोलकर आणि खासदार राजाभाऊ बाजे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, साधू-महंत आणि पदाधिकारीही सोहळ्यात सहभागी होतील.
त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, प्रमुख आखाडे आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट हे सोहळ्याचे निमंत्रक आहेत. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेते, नगर परिषद अध्यक्षा त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्यासह प्रमुख आखाड्यांचे पदाधिकारी नियोजनात सहभागी आहेत.
पोलीस बंदोबस्त आणि धार्मिक विधींची तयारी ध्वजारोहण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनांची बाहतूक, कुशावर्त तीर्थ आणि मंदिर परिसरातील बंदोबस्ताबाबत पोलिसांनी रंगीत तालीम घेत ली आहे. पुरोहित संघाकडून ध्वजारोहणासाठी मंत्रविधानाची आवश्यक तयारी करण्यात आली असून, नगर परिषदही नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सज्ज झाली आहे.




