Tuesday, February 3, 2026
Homeदेश विदेशTrump Tarrif War: भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था...

Trump Tarrif War: भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; ‘भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी…’

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतावर २५ टक्के कर लादल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तोंडी हल्ले करण्यापासून थांबत नाहीत. भारत-रशिया संबंधांवर नाराज असलेल्या ट्रम्प यांनी आता दोन्ही देशांची पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले आहे. भारत-रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निशाणा साधला आहे. भारत-रशियाच्या अर्थव्यवस्थांना आणखी बुडवणार असे त्यांनी म्हंटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मिडियावर लिहिले की, भारत रशियाशी काय करतो याची मला पर्वा नाही. मला फक्त ते एकत्रितपणे त्यांची मृत अर्थव्यवस्था आणखी खाली आणू शकतात याची काळजी आहे. आपण भारतासोबत खूप कमी व्यापार केला आहे. त्यांचे कर खूप जास्त आहे. त्याचप्रमाणे, रशिया आणि अमेरिका देखील जवळजवळ कोणताही व्यापार करत नाहीत. ते असेच चालू ठेवूया.

- Advertisement -

माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांच्यावरही टीका
ट्रम्प यांनी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यावरही टीका केली आहे. ट्रम्प म्हणाले की, रशियाचे अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव अजूनही स्वतःला राष्ट्रपती मानतात. त्यांनी जे बोलले त्याकडे लक्ष दिले पाहिजे. ते एका अतिशय धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहेत.

YouTube video player

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते – ‘लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे कारण त्यांचे कर खूप जास्त आहेत, त्यांच्यावर कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठोर आणि सर्वात अप्रिय गैर-मौद्रिक व्यापार निर्बंध आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी नेहमीच त्यांची बहुतेक लष्करी उपकरणे रशियाकडून खरेदी केली आहेत आणि चीनसह, ते रशियाचे सर्वात मोठे ऊर्जा खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमध्ये हत्या थांबवावी असे वाटते – सर्व काही ठीक नाही! म्हणून १ ऑगस्टपासून भारताला वरील कारणांसाठी २५% कर आणि दंड भरावा लागेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....