Friday, June 20, 2025
Homeदेश विदेशMahua Moitra: तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा लंग्नबंधनात अडकल्या; जर्मनीत...

Mahua Moitra: तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा लंग्नबंधनात अडकल्या; जर्मनीत गुपचूप केला विवाह

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्या आहेत. बिजू जनता दलाचे नेते आणि खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी त्यांनी जर्मनीत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा लग्नानंतरचा फोटो समोर आला आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, महुआ आणि पिनाकी यांनी जर्मनीमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. महुआ यांच्या विवाहावर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महुआ या त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. महुआचे पूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी लग्न झाले होते, परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.

- Advertisement -

महुआ मोईत्रा यांच्या विवाहाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. फोटोमध्ये महुआ मोईत्रा पारंपरिक पोशाखात आणि भरजरी सोन्याच्या दागिन्यांमध्ये दिसून येत आहे. ज्यातून लग्न समारंभाचा साजशृंगार दिसून येतो. हा समारंभ अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये केवळ अत्यंत जवळचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी झाले होते, असे कळते.

महुआ यांची खासदार म्हणून दुसरी टर्म सुरु आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पश्चिम बंगालमधील कृष्णा नगर मतदारसंघातून निवडणूक लढवत जिंकली होती. भाजप उमेदवार कल्याण चौबे यांचा पराभव केला. महुआ दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आल्या. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांचा पराभव केला.

महुआ मोईत्रा यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७४ रोजी आसाममधील कछार जिल्ह्यातील लाबाक या गावी झाला. त्यांनी माउंट होलीओक कॉलेज, मॅसाच्युसेट्स, यूएसए येथून गणित आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडन येथील जेपी मॉर्गन चेस बँकेत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले.

पहिला कार्यकाळ वादग्रस्त
खासदार महुआ मोइत्रा यांचा पहिला कार्यकाळ वादग्रस्त गेला होता. पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. महुआ ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात गंभीरपणे अडकल्या होत्या. त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, या विरोधात महुआने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. महुआ यांच्यावर संसदेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानीसोबत शेअर केल्याचाही आरोप होता.

कोण आहे पिनाकी मिसरा?
बिजू जनता दलाचे माजी खासदार असलेले पिनाकी मिसरा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९५९ रोजी ओडिशाच्या पुरी येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात बीए ऑनर्स आणि नंतर कायद्यात पदवी घेतली. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेले पिनाकी मिसरा 1996 मध्ये पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. नंतर त्यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला आणि 2009, 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवले होते. राजकारणाबरोबरच ते सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकीलही आहेत आणि अनेक संवेदनशील खटल्यांत त्यांनी कामगिरी बजावली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : 30 जूनपर्यंत 8 टक्के सवलतीसह कर भरण्याचे आवाहन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 37 हजार 155 मालमत्ताधारकांनी एकूण 25.09 कोटी रूपयांचा कर भरणा...