बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.तृप्ती देसाई (Tripti Desai) यांनी फेसबुकवर एका पोस्टद्वारे एक यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची नावे असल्याचा दावा त्यांनी केला असून गृहमंत्रालयाने यातील नावांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
तृप्ती देसाई यांनी म्हटले की, कराडचे जाळे हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय, मर्जीतील पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असून देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्याची मागणी त्यांनी केली. तृप्ती देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.
तृप्ती देसाई यांनी शेअर केलेली यादी
- बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API
- रंगनाथ जगताप , अंबाजोगाई ग्रामीण -API
- भागवत शेलार , केज बीट – LCB
- संजय राठोड , अंबाजोगाई – additional Police
- त्रिंबक चोपने ,केज -Police
- बन्सोड ,केज -API
- कागने सतिश , अंबाजोगाई – Police
- दहिफळे, शिरसाळा-API
- सचिन सानप , परळी बिट – LCB
- राजाभाऊ ओताडे ,बीड -LCB
- बांगर बाबासाहेब, केज -POLICE
- विष्णु फड , परळी शहर – Police
- प्रविण बांगर , गेवराई-PI
14 .अमोल गायकवाड , युसुफवडगाव ड्रायवर Police - राजकुमार मुंडे , अंबाजोगाई DYSP ऑफिस- police
- शेख जमिर, धारूर- Police
- चोवले , बर्दापुर – Police
- रवि केंद्रे,अंबाजोगाई- police
- बापु राऊत,अंबाजोगाई – Police
- केंद्रे भास्कर,परळी – Police
- दिलीप गित्ते , केज DYSP ऑफिस- Police
- डापकर- DYSP ऑफिस केज – Police
- भताने गोविंद , परळी -police .
- विलास खरात , वडवणी – Police.
- बाला डाकने,नेकनुर – Police
- घुगे, पिंपळनेर -API