Monday, May 20, 2024
Homeधुळेभरदिवसा गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरला लुटण्याचा प्रयत्न

भरदिवसा गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरला लुटण्याचा प्रयत्न

धुळे । dhule । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील तालुक्यातील आर्वी शिवारात काल भरदिवसा पाठलाग करत गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरला (government contractor) लुटण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात तिघा दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

मालेगाव कॅम्प परिसरातील प्रयास हॉस्पिटलजवळील सुंदरम बिल्डींगमध्ये सुनिल साहेबराव पवार (वय 54) हे गर्व्हमेंट कॉन्टॅक्टर राहतात. ते काल दि. 24 रोजी दुपारी कारने (क्र. एमएच 41 एएम 1117) धुळ्याहून मालेगावकडे जात होते. यावेळी त्यांच्याकडे मजुरांच्या पगाराची एकूण 25 लाखांची रोकड होती. त्यादरम्यान आर्वी शिवारातील रोकडोबा हनुमान मंदिराजवळ एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

त्यांची कार थांबविण्याचा प्रयत्न करत लुटण्याचा प्रयत्न केला. पंरतू पवार यांनी प्रसंगावधान राखत कार न थांबविला आणखी वेगाने पळवित वर्दळीच्या ठिकणी थांबविली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या