Friday, May 3, 2024
Homeनाशिकनवीन नाशकात गढूळ पाणीपुरवठा; साथीच्या आजारांची भीती

नवीन नाशकात गढूळ पाणीपुरवठा; साथीच्या आजारांची भीती

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

सिंहस्थ नगर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या आजाराची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे…

- Advertisement -

मोरवाडी, सिंहस्थनगर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ व अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग्य काय, पण वापरण्यासाठीदेखील योग्य नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या भीतीतून लोक बाहेर पडत असताना पुन्हा एकदा साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. पिण्याचे पाणी जर शुद्ध नसेल तर आजार पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गढूळ पाणी येत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाले आहेत.

पाणीपुरवठा विभागाची चौकशी व्हावी

नवीन नाशिक पाणी पुरवठा विभाग कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. नागरिकांचे अनेक प्रश्न समोर असताना त्यावर अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी काय सुरू आहे? याबाबत चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आमच्या भागात दोन आठवड्यापासून गढूळ पाणी येत असताना एकाही नगरसेवकाला लक्ष द्यायला वेळ नाही. नागरिकांचे काम होत नसतील तर नगरसेवक काय करतात?

प्रतिभा पाटील, नागरिक

आत्ताच आम्ही कोरोनातून सावरत असताना साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. गढूळ पाण्यामुळे जर आजार पसरले तर याला जबाबदार कोण?

वैशाली चौधरी, नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या