Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशतुर्की-सीरियातील मृतांची संख्या ४ हजारांहून अधिक; WHO ने केला 'हा' मोठा दावा

तुर्की-सीरियातील मृतांची संख्या ४ हजारांहून अधिक; WHO ने केला ‘हा’ मोठा दावा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

तुर्कस्तान (Turkey) आणि सीरियासह (Syria) चार देशांमध्ये भूकंपामुळे (Earthquake) अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूकंपाची (Earthquake) तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली आहे…

तुर्कस्तानमध्ये अवघ्या 10 तासांत भूकंपाचे तीन धक्के बसल्याने मोठा हाहाकार उडाला. तुर्की, सीरिया, इस्रायल आणि लेबनॉनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. तुर्की आणि सीरियामध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 20 हजारांहून अधिक लोक जखमी असल्याचे समजते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत एक मोठा दावा केला आहे. भूकंपाच्या घटनांमध्ये आपण अनेकदा पाहिले आहे की सुरुवातीला मृत आणि जखमींची संख्या वेगाने वाढते. भूकंपामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी आरोग्य संघटनेने इशाराही जारी केला. थंडीमुळे अशा लोकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

‘आई मला माफ कर’ म्हणत तरुणीने संपवली जीवनयात्रा

भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

भारताकडून मदत

भूकंपग्रस्त देशातील जनतेला मदत करण्यासाठी भारत यूरोपियन यूनियनच्या सोबत मदत पाठवणार आहे. भारत पाठवत असलेल्या विशेष मदतीत प्रशिक्षित डॉग स्क्वॉड आणि आवश्यक उपकरणांसह 100 कर्मचारी असलेली NDRF च्या 2 टीम पाठवणार आहे.

Viral Video : कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला, मदत करायची सोडून बॉक्स पळवण्यासाठी लोकांची झुंबड

- Advertisment -

ताज्या बातम्या