Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासंततधार पावसात घेतला झाडाचा आडोसा; वीज पडून तरुणाचा मृत्यू

संततधार पावसात घेतला झाडाचा आडोसा; वीज पडून तरुणाचा मृत्यू

सिन्नर । Sinnar

तालुक्यातील शिवडे (Shivade) येथे आज (दि.22) रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास एका तरुणाच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली….(youth dies due to lightening in sinnar taluka)

- Advertisement -

रविंद्र आनंदा पवार (21) रा. एकलव्य वस्ती, शिवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. रविंद्र हा आपल्या शेळया घेऊन परिसरात चारण्यासाठी फिरत होता. दुपारी 3.30 च्या दरम्यान शिवडे (Shivade) परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुरुवात झाली.

यावेळी रवींद्र गावातील जनता विद्यालयाच्या पाठीमागील जागेवर शेळ्या चारत होता. पाऊस सुरू (rain in shivade) झाल्याने तो जवळच असलेल्या एका झाडाखाली त्याने आडोसा घेतला. मात्र, त्याच वेळी झाडावर वीज पडल्याने रविंद्रला जोरदार झटका बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जात त्याला गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात (Sinnar Rural Hospital) शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या