Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऑनलाईन गेमच्या नादात गमावले अडीच लाख रुपये!

ऑनलाईन गेमच्या नादात गमावले अडीच लाख रुपये!

औरंगाबाद – aurangabad

एका तक्रारदार महिलेच्या खात्यातून त्यांच्या मुलानेच मोबाइलवर गेम (Mobile games) खेळण्यासाठी चक्क दोन लाख ४९ हजार ४९९ रुपये खच केले. परस्पर अडीच लाखांचा व्यवहार प्रकरणात महिलेने ग्रामीण (police) पोलिस अधिक्षक कायालयाच्या (Cyber ​​Police) सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक शोध घेऊन तक्रारदार महिलेच्या मुलानेच हे कृत्य केल्याचे सांगितले.

- Advertisement -

मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे सायबर पोलिसांकडे १८ जून रोजी तक्रार दाखल केली. सदर महिलेने तक्रारीत बँकेच्या खात्याशी संबंधित माहिती कोणालाच दिली नसल्याचे सांगितले. होते. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. सदर तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातून कपात झालेल्या रकमेचा तात्रिक पद्धतीने तपास करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

सायबर पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायवर पोलिसांना तक्रारदार यांचे बँक खात्यातून जून २०२१ पासून ४००, ८००, ४००० अशा स्वरूपात रक्कम वजा झालेली असल्याची माहिती समोर आली. ही सर्व रक्‍कम ऑनलाईन गेमिंग ऍपसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले. यावरून तक्रारदार यांचे मुलाकडे याबाबत अधिक चौकशी करता तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर पोलिसांना देऊ लागला. त्याला विश्‍वासात घेऊन त्यांच्या मोबाईल तपासला असता, त्याने त्याचे मोबाइलमध्ये वेगवेगळे ऑनलाईन पेड गेम खेळत असल्याचे तसेच नमूद रक्कम ही प्रत्येकवेळी ऑनलाईन गेमच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी गेममधील डायमंड खरेदी करण्यासाठी वापरत आल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या