Tuesday, April 29, 2025
Homeदेश विदेशTrain Accident : अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेसचा अपघात

Train Accident : अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेसचा अपघात

अहमदाबाद। Ahmedabad

रेल्वे अपघाताच्या (Railway Accident) घटना गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी गुजरातमधील सुरतजवळ अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेने (डब्ल्यूआर) जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिलीय. ही घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. जेव्हा ट्रेन (क्रमांक १२९३२) सायन आणि सुरत रेल्वे स्थानकांदरम्यान गोथंगम यार्डमध्ये पोहोचली होती. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत. वेगळे केलेले डबेनंतर पुन्हा ट्रेनमध्ये जोडले गेले.

हे हि वाचा : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात? अजित पवारांकडून संकेत

या घटनेनंतर तातडीने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेचे आधिकारी तसेच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर ही ट्रेन दुरुस्त करण्यात आली. मात्र, दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ शेकडो प्रवाशांचे हाल झाले. अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या या डबल डेकर एक्सप्रेसचं कपलिंग तुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, कपलिंग तुटल्यानंतर पुन्हा वेगळे झालेले डब्बे जोडण्यात आले. यानंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आली.

हे हि वाचा : आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....