Thursday, May 2, 2024
Homeधुळेटिटाणे दोन गट भिडले, 25 जणांवर गुन्हा, 22 अटकेत

टिटाणे दोन गट भिडले, 25 जणांवर गुन्हा, 22 अटकेत

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील टिटाणे (Titans) येथे मोटार सायकलीचा धक्का (Motorcycle shock) लागल्याच्या कारणावरून दोन गटात धक्काबुक्कीसह (Two groups of clashed) हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून निजामपूर पोलिसात 25 जणांवर गुन्हा (25 people were charged) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 22 जणांना काल अटक (22 were arrested) केली आहे.

- Advertisement -

नसरीन शबकदर पिंजारी (वय 40) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा मोहीज यास मोटार सायकलीचा धक्का लागल्याच्या कारणावरून योगेश सुनिल पाटील याच्यासह मोहन रावसाहेब देवरे, किरण भावसाहेब देवरे, राहुल विजय देवरे, विवेक मुरलीधर पवार, रविंद्र भावसाहेब देवरे, जगदीश शरद देवरे, प्रशांत सुरेश देवरे व अमोल भरत देवरे यांनी गर्दी करीत नसरीन पिंजारी सह तिच पती शबकदर पिंजारी यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. म्हणून वरील नऊ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर परस्परविरोधात रेखाबाई सुनिल नांद्रे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोईन शबकदर पिंजारी यास फिर्यादीचा मुलगा योगेश याच्या मोटार सायकलीचा धक्का लागला.

त्यावरून मोईन शबकदर पिंजारी, तोहीद रिहान शबकदर पिंजारी, शबकदर जुम्मा पिंजारी, नसरिन शबकदर पिंजारी, फारूख जुम्मा पिंजारी, परवीन फारूक पिंजारी, लतीफ गफ्फुर पिंजारी, परवीन लतीफ पिंजारी, गफ्फुर चांद पिंजारी, प्रविण किशोर बागुल, भिकन बळीराम बागुल, युसुफ इस्माईल पिंजारी, कलीमनबाब पिंजारी, जमील जुम्मा पिंजारी, शाखरूख सलीम पिंजारी यांनी योगेश याची दुचाकी अडवून त्यास शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून वरील 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील 14 जणांना अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या