Thursday, April 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजट्रक-टँकर अपघातात दोघांचा मृत्यू

ट्रक-टँकर अपघातात दोघांचा मृत्यू

वावी । वार्ताहर vavi

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका संपायचे नाव घेत नसून मलढोण शिवारात चैनल नंबर 545 वर बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास झालेल्या मालवाहू ट्रकला पेट्रोल वाहतूक करणार्‍या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांंचे चालक जागीच ठार झाले.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर मलढोण शिवारात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताची माहिती समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी मिलिंद सरवदे यांना मिळताच त्यांनी शिर्डी, सिन्नर, गोंदे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष व वावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. .

छत्रपती संभाजी नगर येथून बियरच्या बाटल्यांनी भरलेला मालट्रकचे टायर पंचर झाल्याने चालकाने मळढोण शिवारात रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 20/– 2932 उभा केला व पंक्चर काढण्याचे काम चालू असतानाच भरधाव वेगात नागपूरहून मुंबईकडे जाणार्‍या जिओ कंपनीच्या रिकाम्या पेट्रोल टँकर क्र. एम. एच. 29/ — 2519 ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये दोनही ट्रक व टँकर चालक ठार झाले.

ट्रक चालकाचे नाव समजू शकले नाहीतर मयत टँकर चालकाचे नाव विजेंद्र मनी तिवारी आहे. शिर्डी येथील वाहतूक शाखेच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दोनही वाहनांच्या नंबरवरुन दोनही चालकांच्या नातेवाईकांसह मालकांशी वावी पोलीस संपर्क करत आहे.

नासिक उत्पादन शुल्क विभागाला बिअर भरुन आलेल्या ट्रकबाबत वावी पोलीसांनी माहिती दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोठावळे, हवालदार लगड करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Rate : वांबोरीतील कांदा व गव्हाचे वाचा भाव

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri आज गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 1 हजार 209 कांदा गोण्याची आवक झाली....