Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange: मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, "सरकारमधील दोन मंत्री अन्…"

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “सरकारमधील दोन मंत्री अन्…”

धाराशिव । Dharashiva

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने (Manoj Jarange Patil) प्रयत्न करत आहेत. जानेवारी महिन्यातही त्यांनी पुन्हा सहा दिवसांचे आंदोलन केले होते. यानंतर आता जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाची चळवळ कमकुवत व्हावी, यासाठी सरकारमधील दोन मंत्री आंदोलन करणार आहेत. १३-१४ दिवस उपोषण करून सरकारकडून हे उपोषण सोडवलं जाईल आणि समाजाची दिशाभूल केली जाईल, असा दावा मनोज जरांगे यांनी धाराशिव इथं बोलताना केला आहे.

आता जे गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समोर मराठा आरक्षणावरून सरकार नवं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.आम्ही म्हणू तसे ऐका, अन्यथा षडयंत्र रचून बदनाम करू अशी सरकाची भूमिका आहे. मराठ्यांच्या आंदोलनासमोर प्रति आंदोलन सरकार उभं करणार आहे. दोन मंत्री आहेत या आंदोलनात. दोन मंत्री पाठपुरावा करणार. 12-13 दिवस आमरण उपोषण करणार. या आंदोलनानंतर सरकारच बैठक लावणार आहेत. या सगळ्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांची साथ आहे. हे त्यातल्या एका मंत्र्यानंच मला सांगितलं. असा दावा मनोज जरांगेंनी केला.

दरम्यान, 22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एक आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल असे मनोज जरांगे म्हणाले होते. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत. असं जरांगे म्हणाले होते.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी केलेल्या दाव्यानुसार खरंच राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी काळात उपोषण करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...