Tuesday, August 18, 2026
Homeनाशिकबँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

उपनगर पोलिसांची कामगिरी

नाशिक रोड | प्रतिनिधी
नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथील एसबीआय या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना उपनगर पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजद्वारे अटक केली असून हे दोघेजण याच परिसरात राहणारे आहे. त्यापैकी एक जण वॉचमन म्हणून काम करतो.

यासंदर्भात उपनगर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथे एसबीआय बँकेची शाखा असून या शाखेच्या ठिकाणी एटीएम आहे. (दि 26) ऑगस्ट रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास दोघेजण घुसले व त्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून चोरी करत असताना अचानकपणे कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागल्याने हे दोघेही घाबरले व त्यांनी तेथून पलायन केले. संशयित दोघांनी तोंडाला रुमाल लावलेला होता त्यामुळे चेहरा ओळखणे मुश्किल होते.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, आदींनी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध लावून त्यांना अटक करावी असा आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला.

सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक विशाल सपकाळे, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इमरान शेख, सौरभ लोंढे, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, पंकज करपे, सुरज गवळी, सुनील गायकवाड, संदेश रगतवान, आदींनी परिसरात ठिकठिकाणी शोध घेऊन तसेच घटना स्थळापासूनचे सर्व सीसीटीव्ही चे फुटेज चेक केले असता संशयित चोरट्यांचा मार्ग शोधून काढला.

त्यातील एक जण हा वॉचमन म्हणून ड्युटी करत असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपण आपल्या साथीदारासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली असून चौकशीत त्यांचे नावे विवेक कुमार वय १८ व अनिल कुमार वय १८ राहणार पाल ढाबा नाशिक पुणे रोड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. उपनगर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी अभिनंदन केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...