Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासाकीनाका परिसरात भीषण अग्नितांडव; दोघांचा मृत्यू

साकीनाका परिसरात भीषण अग्नितांडव; दोघांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

येथील अंधेरी परिसरामधील (Andheri Area) साकीनाका (Sakinaka) भागात दुकानाला भीषण आग लागल्याने दोन जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे…

- Advertisement -

सदू – मधू एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले असतील

याबाबत अधिक माहिती अशी की, साकीनाका भागात आज पहाटे दोनच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानाला आग (Fire) लागली. या आगीत हार्डवेअरचे आणि त्याच्या शेजारचे दुकान जळून खाक झाले. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. त्यावेळी एका दुकानात अकरा कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.

बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून… घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी; जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात जुंपली

दरम्यान, या आगीत (Fire News) दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आग लागलेल्या दुकानाची मुंबईतील मोठे हार्डवेअर दुकान म्हणून ओळख होती. दोन मचान असलेल्या दुकानात इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तर आग कशामुळे लागली, याबाबत अधिक तपास स्थानिक साकीनाका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या