Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकी आणि कारचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

दुचाकी आणि कारचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

नगरसुल | वार्ताहर Nagarsul

- Advertisement -

येवला नांदगाव रोड नगरसुल गावाजवळ बाजार तळा जवळ मारुती ओमनी कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

तालुक्यातील नगरसुल येथील येवला नांदगाव राज्यमार्ग क्रं. 25 वर नगरसुल बाजार तळा जवळील वळणावर झालेल्या अपघातात ओमनी चालक लहू संजय घोडेस्वार राहणार नगरसुल हा गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकी चालक रोहित भाऊसाहेब जाधव वय 25 या.येवला याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुचाकी वाहनाचा MH15KB9703 नंबर असून मारूती ओमनी कार च्या नंबर प्लेट तुटून गेल्यामुळे नंबर समजू शकला नाही अधिक तपास येवला तालुका पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...