मुंबई | Mumbai
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी भाषा सक्तीला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. हिंदी भाषा सक्तीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मी त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही तर पाच मिनिटांत हिंदी सक्तीचा विषय संपेल. मात्र सादरीकरण वगैरे गोष्टी केल्या जात आहेत. भाजपाकडून एकाधिकारशाही लादण्याची ही पावले आहेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
हिंदी भाषा सक्तीविरोधात आज मराठी भाषा समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून दीपक पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. दीपक पवार हे हिंदी भाषा सक्तीविरोधत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून आझाद मैदानावर या आंदोलनाला ते सुरूवात करणार आहे.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
उद्धव ठाकरेंनी या भाषा शक्ती वरून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एका शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्व शिक्षकांमध्ये ते मिठाचा नाहीतर विषाचा खडा टाकत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मिठाचा नाही तर विषाचा खडा टाकत आहे..
हा विषय पाच मिनिटांमध्ये संपणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जर जाहीर केले की, मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही किंवा होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची गरज नाही. हे दळण कशासाठी दळताय. भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे तर आता बाटेंगे तो कटेंगे आणि काटेंगे असे त्यांचे धोरण दिसत आहे. सर्व भाषिकांमध्ये मिठाचा नाहीतर विषाचा खडा ते टाकत आहे. आम्ही हिंदी भाषेला विरोध केलेला नाही तर हिंदी सक्तीला विरोध केलेला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाषिक आणीबाणी लादली जात आहे
आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तर ५ मिनीटांत हा विषय संपेल. हिंदीला विरोध नाही कारण हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईतच जन्माला आली. अमिताभ बच्चन असतील, हिंदी कलाकार असतील, गायक असतील हे मुंबईत आले आणि मोठे झाले. हिंदी सिने तारे-तारका इथे येऊन मोठी होतात. एकाधिकारशाहीकडे भाजपाची वाटचाल सुरु आहे. आणीबाणी लादल्याचा विषय भाजपाने आणला होता. त्यांनी बुधवारच्या दिवशी विरोध दर्शवला पण मी हे सांगतो आहे की भाषिक आणीबाणी आहे. भाषिक आणीबाणी भाजपाकडून लादली जाते आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन झाले आहे. आपल्या देशाची रचना भाषावर प्रांतरचना झाली आहे. प्रांत मिळाल्यानंतर राजधानी, मुख्यमंत्री मिळाले. मी मुख्यमंत्री असताना मला मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. ती सक्ती मी केली होती त्याबद्दल या सरकारने काय केले? हे माझ्या वाचनात आलेले नाही. मराठी रंगभूमीचे दालन करायचे ठरवले होते, आराखडा मंजूर झाला होता पण महाराष्ट्र द्रोही सरकारने ते हाणून पाडले. बिल्डर्सच्या घशात ती जमीन घातली आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवनाचेही भूमिपूजन झाले होते तिथे एकही वीट रचली गेलेली नाही. अजित पवार तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. हे जे काही चालले आहे ते त्यांना मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘कोणत्याही भाषेचा द्वेष नाही. पण कारण नसताना हिंदी सक्ती लादली गेली. महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही. महाराष्ट्रावर हुकुमशाही लादण्यासाठी यांना शिवसेना संपवायची आहे. पण शिवसेनेचा जन्म मराठी माणसांवर होणाऱ्या अन्ययाविरोधात लढण्यासाठी झाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




