Tuesday, August 18, 2026
Homeक्राईमNewasa : पावणेपाच लाखांच्या 48 किलो गांजासह दोघांना रंगेहाथ पकडले

Newasa : पावणेपाच लाखांच्या 48 किलो गांजासह दोघांना रंगेहाथ पकडले

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

तालुक्यातील वाकडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. जवळपास पावणेपाच लाख (4 लाख 78 हजार) रुपये किमतीचा 48 किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत माहिती अशी की, स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगणार्‍या व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना नेवासा पोलिसांनी 24 जुलै च्या मध्यरात्रीच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 4 लाख 78 हजार 60 रुपयांचा तब्बल 47.828 किलो गांजा जप्त करण्यात आला.

- Advertisement -

वाकडी शिवारात गुंगीकारक अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या उपस्थितीत तात्काळ वाकडी येथील महादेव पंडित जवदे याच्या राहत्या घराजवळील शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. पोलिसांनी शेडची पाहणी केली असता तेथे पिवळ्या, पांढर्‍या आणि हिरव्या रंगाच्या 3 वेगवेगळ्या गोण्यांमध्ये गांजाचा साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. पिवळ्या गोणीत 15 किलो 842 ग्रॅम (किंमत 1 लाख 58 हजार 420 रुपये), पांढर्‍या गोणीत 13 किलो 100 ग्रॅम (किंमत 1 लाख 31 हजार रुपये) आणि हिरव्या गोणीत 18 किलो 886 ग्रॅम (किंमत 1 लाख 88 हजार 640 रुपये) असा एकूण 47 किलो 828 ग्रॅम गांजा मिळून आला.

या कारवाईत पोलिसांनी महादेव पंडित जवदे (वय 38) आणि त्याचा साथीदार शुभम बाबासाहेब काळे (वय 29) दोघे रा. वाकडी, ता. नेवासा यांना ताब्यात घेतले. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार शहाजी बाबासाहेब आंधळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुरनं 634/2026, भारतीय न्याय कलम 20,22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक मनोज अहिरे, उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार शहाजी आंधळे रवी शेळके अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, हरी धायतडक संदीप ढाकणे, सुमित करंजकर, नवनाथ शेकडे, गणेश फाटक, राहुल गायकवाड, नारायण डमाळे, चालक पोलीस हवालदार खंडागळे मेजर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे व होमगार्ड यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात २८ ऑगस्टपासून धर्मस्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी; गृह विभागाकडून अधिसूचना जारी

0
मुंबई | प्रतिनिधीराज्यात सक्तीचे, फसवणुकीचे अथवा बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ ची अंमलबजावणी येत्या २८ ऑगस्टपासून होणार आहे. गृह विभागाने मंगळवारी यासंदर्भातील...