Tuesday, September 29, 2026
HomeनगरAhilyanagar : एमडी ड्रग्स प्रकरणात आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Ahilyanagar : एमडी ड्रग्स प्रकरणात आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमपीआयडी पोलिसांकडून पुरवठा साखळीचा तपास सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

निंबळक बायपास परिसरातून सुमारे 5.83 लाख किमतीचे 29.16 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजस्थानमधील तरुणाला शनिवारी (25 जुलै) न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आरोपीकडून एमडी ड्रग्सच्या पुरवठा साखळीबाबत तसेच त्याच्या स्थानिक संपर्कांबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

अटक आरोपी रविप्रकाश भेराराम बिश्नोई (वय 29, मूळ रा. विरावा, ता. शितलवाना, जि. जालोर, राजस्थान, सध्या रा. करमाळा, जि. सोलापूर) याच्याकडून एमआयडीसी पोलिसांनी 29.16 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. प्राथमिक चौकशीत आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अहिल्यानगरात आणत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान आरोपी अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही काळापासून एमडी ड्रग्सची विक्री करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने यापूर्वी किती वेळा शहरात येऊन अंमली पदार्थांची विक्री केली, त्याच्याकडून ड्रग्स कोणाकडून आणले जात होते आणि स्थानिक स्तरावर त्याचे ग्राहक किंवा सहकारी कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, कारवाईच्या वेळी दुसर्‍या विनानंबर कारमधून पळून गेलेल्या दोन संशयितांचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. त्यापैकी एकाचे आडनाव तांबे असल्याची माहिती समोर आली असून दुसर्‍या संशयिताची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोघांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीकडून मिळणार्‍या माहितीनुसार एमडी ड्रग्सच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...