Sunday, September 27, 2026
Homeराजकीयनिवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची वज्रमूठ; ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची वज्रमूठ; ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

मुंबई । Mumbai

निवडणूक आयोगाच्या विविध प्रक्रियांवर आणि मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप घेण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांच्या भेटीला दाखल झाले. या शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे, युतीच्या चर्चांना जोर येत असतानाच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे प्रवास करत मंत्रालय गाठले. या दोन नेत्यांच्या एकत्रित कृतीमुळे राजकीय वर्तुळात वज्रमूठ अधिक घट्ट झाल्याची चर्चा आहे, तर आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत मोठा बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...