मुंबई | Mumbai
लोकसभेच्या निकालानंतर (Lok Sabha Result) आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) छत्रपती संभाजीनरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारने (State Government) आणलेल्या ‘लाडकी बहीण योजने’वरून टीका केली. तसेच सत्ताधाऱ्यांवर जोरदार आखपाखड केली
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “लोकसभेच्या निकालानंतर मुंबईबाहेर पडलो आणि शिवसेना प्रमुखांच्या संभाजीनगरमध्ये प्रथम आलो आहे. जमलेल्या शिवसेना प्रमुखांच्या लढवय्या, कट्टर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. या संभाजीनगरमध्ये मुद्दाम आलो आहे, जे गद्दार जिंकले आहेत, त्यांना सांगायला आलो आहे की, काल तुम्ही जिंकला असला तरी मी येत्या विधानसभेत (Vidhansabha) छत्रपती संभाजीनगर जिंकणार आहे, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा गंडा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “मोदी सरकारचे (Modi Government) उधळलेले खेचर ४०० पार करणार होते. आपण त्या खेचराला महाराष्ट्रात ४० वरुन ९ वर आणले. आपल्या विजयी खासदारांमध्ये संभाजीनगरचा खासदार नाही याचे मला शल्य आहे, शिवसेनाप्रमुखांनाही असणार. या ठिकाणी हार झाली आहे हे वास्तव आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी भगव्याची बीजे रोवली. त्यांनी संपूर्ण मराठवाडा पादक्रांत केला. हक्काची छत्रपती संभाजीनगरची जागा गमवावी लागली. आपला उमेदवार कित्येक वर्षे शिवसेना एके शिवसेनेत राहिले. हार जीत होत असते. निवडणुकीत हारलो तरी आयुष्य संपत नाही. लढण्याची हिंमत हरता कामा नये”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,”गळती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे.हे पुन्हा गादीवर बसणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. माता-भगिनींना समोर ठेवून निवडणुकीला सामोरे जायची तयारी यांनी सुरु केली आहे. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत. मागच्या दहा वर्षांत ज्या योजना जाहीर केल्या त्यातल्या किती अंमलात आणल्या? शेतकऱ्यांना नुसतं वीज-बिल माफी करु नका. सगळी थकबाकी वसूल करणार आणि वीज बिल माफ करणार हे करु नका. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. हे सरकार म्हणून जे जुमलेबाज आहेत त्यांनी थकबाकीसह वीच बिल माफ करतो असे जाहीर करावे” असेही त्यांनी म्हटले.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा