Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना…; उध्दव ठाकरेंचा...

Uddhav Thackeray: पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना…; उध्दव ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय अधिवेशन 2025 चे मुलूंड येथे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनाचे उ‌द्घाटन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत भाजपावर ही टीका केली. माघी गणेशोत्सवात राज्य सरकारने नोटिसा बजवल्या. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे महाकुंभ सुरु आहे. त्यात सर्वजण डुबकी मारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डुबकी मारली. पण पीओपी गणेश मूर्त्यांचे विसर्जन होणार नाही, अशी नोटीस सरकार बजावत आहे.

काय म्हणाले उध्दव ठाकरे?
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि नियमांवर बोट ठेवत मुंबई महापालिकेने माघी गणेशोत्सवातील प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींचे विसर्जन करू न दिल्याने मुंबईतील गणेशोत्सव मंडळे तसेच मूर्तीकारांमध्ये रोष आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, कुंभमेळामध्ये अनेक जण डुबकी मारायला जात आहेत. प्रत्येकाची श्रद्धा आहे यावर मी काही बोलत नाही. पंतप्रधानांनी सुद्धा कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करू देत नाहीत. पीओपी मुर्तीमुळे प्रदूषण होते, हे मान्य आहे. पण तुम्ही आदल्या दिवशी सांगतात की, विसर्जन होऊ शकत नाही. तुमच्या निर्णयामुळे माघी गणेशोत्सवातील अनेक मूर्ती विसर्जनाच्या राहिल्या आहेत. तुम्ही ऐनवेळी नियम लावतात आणि पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करू देत नाही हे मुंबईत ठिकठिकाणी मुर्त्या अशाच ठेवल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांनी माहिती घ्या, किती ठिकाणी मुर्त्या विसर्जन करायच्या राहिल्या आहेत, मग ठरवू काय करायचे, तुमचे कसले हिंदुत्व? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...