Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीवर उध्दव ठाकरेंच स्पष्टीकरण; म्हणाले, "ना ना करते प्यार…"

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीवर उध्दव ठाकरेंच स्पष्टीकरण; म्हणाले, “ना ना करते प्यार…”

मुंबई | Mumbai
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनपेक्षित घटना पहायला मिळाल्या. सुरवातीला भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांची चर्चा होत नाहीच की आणखी एक घटना घडली. विधानभवनाच्या लिफ्टजवळ उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये काही क्षण चर्चा झाली. दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास ही केला. दोघांमध्ये झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काहीकाळ चर्चांना उधाण आले होते. मात्र, या भेटीवर आता खुद्द उध्दव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

“आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… ती अनौपचारिक भेट झाली. काही चर्चा नाही. भिंतीला कान नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू” असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

हे ही वाचा: विधानपरिषद निवडणुकीआधी भाजपची वेगळी चाल; ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनपेक्षित घटना घडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. विधानभवन परिसराच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यांच्यात काही वेळ संवादही झाला. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याआधी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्यातही काही मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले.

उध्दव ठाकरे भेटीवर काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस आणि मी लिफ्टने एकत्र प्रवास केला. तिथे कुणीही नव्हते. ते एक गाणं आहे, ‘ना ना करते प्यार’ याचा नाना पटोलेंशी काही संबंध नाही, अशी कोटी केली. तर ना ना करते प्यार, तुमसें कर बैठे असे आमच्यात काही नाही. ती योगायोगाने झालेली भेट होती. भिंतीला कान असतात असे म्हणतात. पण लिफ्टला कान नसतात. आता गुप्त भेटीसाठी लिफ्ट हे चांगले ठिकाण आहे, अशी मिश्किल प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या