Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : बाळासाहेबांवरील 'त्या' प्रश्नाला उद्धव ठाकरेंचे सूचक उत्तर; नेमकं काय...

Uddhav Thackeray : बाळासाहेबांवरील ‘त्या’ प्रश्नाला उद्धव ठाकरेंचे सूचक उत्तर; नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामकाजाची पाहणी केली. शिवाजी पार्क परिसरात स्मारकाचे काम सुरु आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याची पाहणी आज ठाकरेंनी केली. दुसऱ्या टप्प्याचे काम २३ जानेवारी २०२६ च्या आधी पूर्ण होईल, असे ठाकरे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरं देतांना सांगितले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचं कामही सुरु झालं आहे तसंच गेल्या काही वर्षांपासून याबाबत चर्चाही सुरु आहे. आर्टिटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचे धन्यवाद देतो. कारण हे काम आत्ता छान वाटतं आहे पण ते करणं जिकिरीचं होतं. एक महत्त्वाचा योगायोग म्हणजे या स्मारकाच्या शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही स्मारक आहे. महापौर बंगला या वास्तूशी आम्ही भावनिकरित्या जोडलो गेलो आहोत” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तसेच “महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे, वास्तूला धक्का न लावता, इथलं वैभव जपून काम करणं कठीण होतं. सीआरझेडचा कायदाही होता. आभा लांबा यांनी भूमिगत स्मारक करुया ही कल्पना मांडली. समुद्राचा रेटा जमिनीच्या खालूनही मोठा असतो. ते आव्हान स्वीकारुन हे काम पूर्ण करण्यात आलं. खबरदारी घेऊन वास्तू उभी करणं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे आभा लांबा यांचे मी आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. चार भिंती आणि नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा दोन आता सुरु होईल. शिवसेनाप्रमुख यांचा जीवनपट स्मारकात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आत्मचरित्र कधीच लिहिलं नाही. त्यांना विचारलं की ते म्हणायचे मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचं आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक असं झालं पाहिजे की जे विचार त्यांनी आपल्या देशाला, राज्याला दिले तेच विचार त्यांच्या स्मारकानेही दिले पाहिजेत”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

तर “इंडिया आघाडीच्या नेत्यांना बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला बोलावणार का, असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर बाळासाहेब हृयात असताना इंडिया आघाडी नव्हती, असं उत्तर ठाकरेंनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यात येत आहे. शेजारी समुद्र असल्यानं या ठिकाणी भूमिगत स्मारक उभारणं अतिशय आव्हानात्मक, जिकरीचं काम आहे. काम करताना सोपं वाटत असंल, पण ते करताना फार कठीण आहे,” असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या