Thursday, May 7, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : "येत्या ५ जुलैला आम्ही..."; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, नेमकं...

Uddhav Thackeray : “येत्या ५ जुलैला आम्ही…”; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी (Hindi) सक्तीच्या विरोधात मनसे, शिवसेना ठाकरे गटासह विविध पक्ष आणि मराठी लोकांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर राज्य सरकारला (State Government) हिंदी सक्तीसाठी काढलेले दोन जीआर रद्द करावे लागले याची घोषणा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे हा मराठी लोकांचा विजय असल्याचे राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. मात्र, हा निर्णय रद्द करूनही राज्य सरकारने नवीन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीलाही आता उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा पुन्हा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना, शिवसैनिक तर आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या-ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जर त्यांनी जीआर रद्द केला नसता तर ५ जुलैच्या मोर्चात भाजप, अजित पवार गटाचे मराठी प्रेमी सहभागी होणार होते. सरकारने केविलवाणा प्रयत्न केला आहे तरी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. अशी थट्टा सरकारने करू नये, हा शिक्षणाचा विषय आहे. सक्ती विषय हा आता संपला आहे, त्यांना आता काहीही करू देणारं नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “येत्या ५ तारखेला आम्ही एकजूटीचे दर्शन दाखवल्याशिवाय राहणार नाही. ५ तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आहोत. ज्या प्रमाणे आंदोलनात सगळे एकजूट होऊन उतरले होते. तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवात दाखवण्याची आवश्यकता आहे. मला सगळ्यांना सांगायचे आहे की, आपण विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठीद्रोही हे डोकं वर काढतात. काल यांचं डोकं चेपलेलं आहे. फणा वर येऊ नये असे वाटत असेल, तर ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजूटीचे दर्शन आम्ही ५ तारखेला घडवू”, असेही उद्धव ठाकरे सांगितले.

तसेच “पहिलं मराठी-अमराठी करायचे, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही. मराठी-अमराठी वाद होत नाही. मराठी माणूस एक येऊ नये म्हणून जीआर सरकारला रद्द करावा लागला आहे. गिरणी कामगारांची समितीदेखील आम्हाला येऊन भेटून गेली होती. गिरणी कामगारांसोबत (Girni Kamgar) आम्ही आहोतच”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

Crime News : टरबूज परत केल्याच्या रागातून सावेडीत राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजाराजवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी (4 मे) सायंकाळी घडली. विकत घेतलेले टरबूज...