Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशनीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

दिल्ली | Delhi

पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींहून अधिक रक्कम बुडवून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. नीरव मोदी इंग्लंडमध्ये लपून बसला होता.

- Advertisement -

याबाबत माहिती देताना CBI अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नीरव मोदी भारताच्या ताब्यात येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १४ हजार कोटींहून अधिक रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे अलीकडेच नक्की झाले होते.

याआधी नीरव मोदीने आपल्या विरोधातील ‘एक्ट्रॅडीक्शन’ आदेशाला कोर्टात आव्हान दिलं होतं. दोन वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश सॅम्यूअल गूजी यांनी निर्णय दिला होता की, नीरव मोदीच्या विरोधात कायदेशीर खटला आहे, ज्यामध्ये त्याला भारतीय न्यायालयासमोर दाखल व्हावं लागेल आणि त्याच निर्णयानुसार ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी यास मंजूरी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या