Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशRussia Ukraine War : मी कुणालाही घाबरत नाही, लाईव्ह लोकेशन शेअर युक्रेनच्या...

Russia Ukraine War : मी कुणालाही घाबरत नाही, लाईव्ह लोकेशन शेअर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच रशियाला थेट आव्हान

दिल्ली | Delhi

रशियानं युक्रेनवर (Russia Ukraine War) केलेल्या हल्ल्याचा आज १३ वा दिवस आहे. शत्रुसमोर तुलनेनं अतिशय लहान असलेल्या युक्रेन सैन्यानं (Ukraine army) प्राणपणानं शत्रुला नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेत.

- Advertisement -

जीवाला धोका असूनही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) स्वत: मैदानात उतरून सैन्याचं आणि नागरिकांचं मनोधैर्य वाढवण्याचं आणि जगाला आपल्या धैर्याची, शौर्याची प्रचिती देण्याचं काम करत आहेत. (Russia Ukraine War Volodymyr Zelensky Posts Video Of Himself Strolling Around Ukraine Presidential Palace Kyiv Amid Russia Attack, Watch Video)

यादरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे.

युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की यांना ठार करण्यासाठी रशियामधील अनेकजण कीव्ह शहरात उपस्थित आहेत. त्यांना झेलेन्स्की यांची हत्या करण्याचा आदेश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यादरम्यान झेलेन्स्की यांनी मात्र थेट आव्हानच दिलं आहे.

वोलोदिमिर झेलेन्स्की एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ते कोणत्याही बंकरमध्ये लपलेले नाहीत, तर कीव्हमध्येच आहेत. आणि देशभक्तीने भारलेले हे युद्ध जिंकण्यासाठी मी कीव्हमध्येच राहिलेले हिताचे असल्याचे ते म्हणाले.

मी मैदान सोडणार नाही. सोमवारचा दिवस माझ्यासाठी नेहमीच कठीण असतो. आपल्या देशात युद्ध सुरू आहे. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक दिवस आता सोमवार आहे. ते म्हणाला की मी येथे कीव्हमधील बारकोवा गल्लीमध्ये आहे. मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी रशियन फौजांना ललकारताना आपल्या सैन्याला आणि नागरिकांनाही विश्वास दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या