Thursday, March 13, 2025
Homeनगरअनधिकृत नळ कनेक्शन विरोधात फौजदारी कारवाई

अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात फौजदारी कारवाई

पाणी चोरांविरोधात मनपा आयुक्त डांगे आक्रमक || तीन गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहिम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधित नळधारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. गोविंदपुरा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणार्‍या मालमत्ताधारकासह छत्रपती संभाजी रोडवरील दोन मंगल कार्यालयातील पाच चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नगर शहरात मनपाचे पाणी चोरून घेणार्‍या नागरिकांनी त्यांचे नळ कनेक्शन अनधिकृत असल्यास ते तत्काळ अधिकृत करून घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. गोविंदपुरा परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घरासमोर महानगरपालिकेची परवानगी न घेता रस्ता फोडून अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न एका मालमत्ताधारकाने केला. त्यासाठी 15 फूट लांब रस्ता खोदण्यात आला. संबंधित प्रभाग अधिकार्‍यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी कठोर कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार गंभीर असून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक व नुकसान करणारा आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संपूर्ण शहरात अशा प्रकारे अनधिकृत नळ कनेक्शन घेणार्‍यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

यासह शहर पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळजोड घेऊन अत्यावश्यक सेवेत बाधा आणली, तसेच सरकारी मालमत्तेचे तसेच महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील दोन मंगल कार्यालयांच्या पाच चालकांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिका प्रभाग समिती 3 चे प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार मीर शफीउद्दिन मीर कमरुद्दिन कवीजंग जहागीरदार (कवीजंग लॉन), सय्यद महम्मद अनीस महम्मद इसहाक (ताज गार्डन व कवीजंग लॉन), सय्यद मरूलहक्क इस्माईल (ताज गार्डन व कवीजंग लॉन), सय्यद महम्मद अनिस (ताज गार्डन व कवीजंग लॉन), सय्यद परवेज महम्मद शफी (ताज गार्डन व कवीजंग लॉन) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रभाग समितीकडे यासंदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार प्रभारी प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांसमवेत छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पाहणी केली असता त्यांना ताज गार्डन व कवीजंग लॉन या ठिकाणी अनाधिकृत नळजोड घेण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस अंमलदार संजीवनी नेटके करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...