Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

मोठी बातमी! ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) ‘एक देश, एक निवडणूक’ (one nation one election) हे धोरण राबविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता. त्यानंतर आज (दि.१२ डिसेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला (Bill) मंजुरी दिली आहे.त्यानंतर आता पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निवडणूक सुधारणांच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून भाजप (BJP) ‘एक देश, एक निवडणूक’ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर आता हे विधेयक केंद्र सरकारने (Central Government) आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले आहे. त्यामुळे एक देश, एक निवडणूक’ पद्धत २०२८ पर्यंत अस्तित्वात आणण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने १८ हजार पृष्ठांचा अहवाल तयार केलेला आहे. ज्यावर २१ हजार दुरुस्त्या येऊन त्यापैकी ८० टक्के दुरुस्त्या या पद्धतीच्या बाजूने आहेत अशी समिती सांगते.

दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत आठ सदस्य होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी, डीपीए नेता नेता गुलाब नबी आझाद, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांचा समावेश होता. तसेच पंधराव्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एनके सिंह, लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष कश्यप आणि संजय कोठारी हे या समितीचे सदस्य होते. या समितीच्या ३७६ पृष्ठांचा संक्षिप्त अहवाल वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. या विधेयकावर संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सरकार सर्वसमावेशक विधेयक आणण्याची शक्यता आहे.​

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...