Monday, May 20, 2024
Homeजळगावविद्यापीठास शनिवारपासून दिवाळीनिमित्ताने सलग पाच दिवस सुट्या

विद्यापीठास शनिवारपासून दिवाळीनिमित्ताने सलग पाच दिवस सुट्या

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहिल. दि.२२ ऑक्टोबर आणि दि.२५ ऑक्टोबर रोजी दिवाळी (Diwali) निमित्त कुलगुरुंच्या अधिकारातील स्थानिक सुट्टया (holidays) जाहिर करण्यात आल्‍या आहेत.  

- Advertisement -

 कुलगुरुंना त्यांच्या अधिकारात वर्षभरात तीन स्थानिक सुट्ट्या जाहिर करता येतात. त्या अनुषंगाने या सुट्टया जाहिर करण्यात आल्या आहेत. वरील सुट्टया व राज्य सरकारने जाहिर केलेल्या सुट्टयांसह विद्यापीठाचे कामकाज दि. २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहील अशी माहिती कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी दिली. 

- Advertisment -

ताज्या बातम्या