Wednesday, April 8, 2026
HomeनगरAhilyanagar : अज्ञात रोगाने गायींचा मृत्यू; जिवाणू, विषाणू की विषबाधा?… तपास सुरू

Ahilyanagar : अज्ञात रोगाने गायींचा मृत्यू; जिवाणू, विषाणू की विषबाधा?… तपास सुरू

पशूसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय रोग अन्वेशन विभागाकडून मृत जनावरांचे पोस्टमार्टम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जनावरांच्या शरिरातील तपमान अचानक कमी होवून ते चारा खाणे बंद करतात. त्यानंतर संबंधीत जनावरांच्या शेवटीकडील बाजूने पक्षाघाताला सुरूवात होवून आधी मागचे दोन पाय पॅरेलाईज होवून जनावर (गायी) खाली बसतात आणि एकाच दिवसात संबंधीत जनावरांचा मृत्यू होत असल्याच्या घटना नगर आणि पारनेर तालुक्यात वाढल्या आहेत. गेल्या 14 फेबु्रवारीपासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत 32 गायी दगावल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मृत पावलेल्या गायीचे पुण्याच्या पशूसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय रोग अन्वेशन विभागाच्या पशूवैद्यक यांनी शवविच्छिेदन केले आहे. तसेच मृत गायीचे काही अवयव पुण्याला तपासणीसाठी नेण्यात आलेले आहेत. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत त्याचा अहवाल आलेला नव्हता. यामुळे नगर आणि पारनेर तालुक्यात मरण पावलेल्या 32 आणि सध्या उपचार सुरू असणार्‍या 9 गायींना नेमके काय झाले याचा उलगडा झालेला नव्हता. पशूसंवर्धन विभागाच्या सुत्रांच्या माहितीनूसार एकतर पशूखाद्यामुळे (मूरघास) विषबाधा किंवा अज्ञात विषाणू- जीवाणूमुळे संबंधीत गायी बाधित होवून मृत पावल्या असल्याचा अंदाज आहे. मात्र, याबाबत पुण्याच्या प्रयोग शाळेचा अहवाल आल्यावर वस्तूस्थिती समोर येणार असल्याचे पशूसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील यांनी सांगितले.

दुसरीकडे गेल्या 15 दिवसापासून पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ आणि नगर तालुक्यातील हिवरेबाजार, खातगाव टाकळीसह आजूबाजूच्या गावात गायीमध्ये या अज्ञात रोगानचे प्रार्दुभाव दिसत असून आतापर्यंत 32 गायी दगावल्या आहेत. तर 9 गायींवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यातील पशूसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेशन विभागाचे डॉ. पठाण आणि त्यांचे पथकाने नुकतीच बाधीत गावांना भेट देत मृत गायीचे शवविच्छेदन केलेले आहे. यातील 7 ते 8 जनावरांचे नुमने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एक नमुना नायट्रोजन पॉझिटीव्ह असल्याचे पशूसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. मात्र, सर्व जनावरांचा मृत्यू हा नायट्रोजनमुळे झाला नसल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

नगर आणि पारनेर तालुक्यातील वाढत्या गायींच्या मृत्यूबाबत आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकराची चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना, पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सचिव डॉ. रामा स्वामी यांना पाठवलेल्या पत्रात पद्मश्री पवार यांनी म्हटले, हिवरे बाजार, दैठणे गुंजाळ आणि टाकळी खातगाव या परिसरातील गायींना एका अज्ञात आजाराने ग्रासले असून, गेल्या काही दिवसांत सुमारे 32 गायींचा मृत्यू झाला आहे. यामुळे बाधित शेतकर्‍यांना 75 टक्के नुकसान भरपाई मिळावी आणि या आजाराचे तातडीने सखोल संशोधन व्हावे.

हिवरे बाजार (ता. नगर), दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) आणि टाकळी खातगाव या 5 किमी परिघातील गावांमध्ये गायींच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाचे पथक, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेटी देऊन रक्ताचे नमुने, चारा, पाणी आणि शवविच्छेदनाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र, अद्याप या आजाराचे नेमके निदान होऊ शकलेले नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

पद्मश्री पवार काय म्हणाले…
जिल्ह्यातील मृत जनावरांना सध्या जिल्हा परिषदेकडून केवळ 10 हजार रुपये मदत मिळते, जी उपचारासाठीही अपुरी आहे. एका गायीची किंमत 1 ते दीड लाख रुपये असल्याने, शासनाने किमान 75 टक्के नुकसान भरपाई द्यावी. गायींमधील आजाराचे तातडीने संशोधन: पिकांवरील तणनाशके, रासायनिक खतांचा अतिवापर आणि खाद्यातील युरिया यामुळे चारा विषबाधा होत आहे का? याची कृषी व पशुसंवर्धन विद्यापीठामार्फत तातडीने तांत्रिक चाचणी व्हावी. विमा निकषात शिथिलता: केवळ बँक कर्ज असलेल्या जनावरांनाच विमा मिळतो, हा नियम बदलून सर्व जनावरांसाठी अल्पदरात विमा योजना सुरू करावी. तोपर्यंत दूध सोसायट्यांच्या पावत्या ग्राह्य धरून मदत द्यावी. शासकीय आदेशाची गरज: पशुपालक पूर्णपणे दूध व्यवसायावर अवलंबून असल्याने, मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने मदतीचे आदेश द्यावेत. शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात दुभत्या जनावरांचा असा मृत्यू होणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. शासनाने याकडे युद्ध पातळीवर लक्ष द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : माजी महापौर कळमकर कडून आणखी एका तरूणीवर अत्याचार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar माजी महापौर अभिषेक कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप शहरातील एका तरूणीने (वय 27) केला आहे. यासंदर्भात पीडित तरूणीने...