Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतलावात आढळला अनोखळी तरुणाचा मृतदेह

तलावात आढळला अनोखळी तरुणाचा मृतदेह

पेठ । प्रतिनिधी Peth

पेठ शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गावतळ्यात सकाळी 10 वाजे दरम्यान मृतदेह तरंगत असल्याची माहिती पेठ पोलीसांना मिळाली. घटनास्थळी पो. नि . गोंदके यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असता तलावाच्या पूर्वबाजूच्या कडेस पानवेलीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

25 ते 30 वयोगटातील तरुणाच्या हातावर हेमलता नाव गोंदलेले आहे. मृतदेह कुजल्याने ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे .

पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाबाबत कुणास माहीती असल्यास पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गोंदके यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

जेन

Vishwas Nangare Patil: जेन झी शी बोलणंही कठीण, स्क्रोलिंगमुळे केमिकल लोचा;...

0
नागपूर | Nagpurमागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जेन झी पिढीची चर्चा सुरू आहे. मागील १२ वर्षात जे कुणालाच जमले नाही, ते जेन झीने...