Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशलॉकडाउन जैसे थे; अनलॉक 5 चे नियम 30 नोव्हेंबरपर्यंत कायम

लॉकडाउन जैसे थे; अनलॉक 5 चे नियम 30 नोव्हेंबरपर्यंत कायम

नवी दिल्ली –

- Advertisement -

करोनाच्या संकटामुळे देशात करण्यात आलेली टाळेबंदी (लॉकडाउन) टप्प्याटप्प्याने शिथिल केली जात आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने

30 सप्टेंबरला लॉकडाउनच्या अटी शिथिल करण्याबाबत जी नियमावली जाहीर केली होती ती 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यानूसार कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये हा नियम लागू असेल असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

गृह मंत्रालयाने आज (27 ऑक्टोबर) पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

दरम्यान, देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरु करण्यात आला. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू अनेक गोष्टींना संमती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. भारतातील करोना रुग्णांच्या एकूण संख्येत वाढ झाली असली तरीही करोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. एवढंच नाही तर अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या संख्येतही घट झाली आहे. असं असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊनच जिम, रेस्तराँ, हॉटेेल्स हे सगळं उघडण्यास केंद्र सरकारने संमती दिली आहे. अशात करोना कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच असेल आणि 30 नोव्हेंबरपर्यंत तो असेल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या