Friday, May 3, 2024
Homeजळगावनऊ वर्षाच्या बालकावर अनैसर्गीक कृत्य

नऊ वर्षाच्या बालकावर अनैसर्गीक कृत्य

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा येथे गल्लीत सायकल खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या बालकास तुला दहा रुपये देतो आणि पिक्चर दाखवतो असे सांगून बालकाशी अनैसर्गिक कृत्य करण्याची घटना काल घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हां दाखल झाला आहे.

- Advertisement -

पीडीत बालकाच्या पित्याने चाळीसगांव शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याचा नऊ वर्षाचा मुलगा हा दुपारच्या वेळेस गल्लीत सायकल फिरवत असतांना, त्याच परिसरातील बंटी उर्फ रोहीत भरत पवार रा. भगवानचौक टाकळी प्र. चा.ता.चाळीसगांव याने बालकास दहा रुपयाची नोट दाखवित, तुला पिक्चर दाखवतो असे आमिष दाखवित परीसरातील विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या एका घराच्या पायरीवर नेवून त्याचेशी अनैसर्गिक कृत्य करण्यास सुरुवात केली, परंतू बालकाने त्यास विरोध करीत होता, याचवेळी ही घटना पिडीत मुलाच्या नातेवाईकाच्या नजरेस पडल्यानंतर त्याने सदर नराधमास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून पळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या