Thursday, May 2, 2024
Homeनाशिकश्री.माहेश्वरी विद्यार्थी भुवन कार्यकारी मंडळाची निवडणुक बिनविरोध

श्री.माहेश्वरी विद्यार्थी भुवन कार्यकारी मंडळाची निवडणुक बिनविरोध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

 नाशिक जिल्हातील ( Nashik District )अग्रगण्य अशा श्री माहेश्वरी विद्यार्थी भुवन (Election of Shri. Maheshwari Vidyarthi Bhuvan ) या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी बिझनेस बँकेचे विद्यमान चेअरमन अशोक तापडीया,उपाधाक्षपदी निरज भट्टड, सरचिटणीसपदी सी.ए.आनंद झंवर,कोषाध्यक्षपदी सी ए श्रीकांत राठी, चिटणीसपदी अरविंद नावंदर यांची निवड करण्यात आली.

- Advertisement -

याबरोबरच कार्यकारणी सदस्य म्हणून अनिल बुब, अजित करवा,जयंती लाहोटी,तुषार मणियार,विजय केला,शांतीलाल लढ्ढा,डॉ.महेश बुब,पवन भुतडा,राजेंद्र भांगडीया,रविष मारू,त्रिभुवनलाल काल्या, सुनील भुतडा, नितीन काबरा,अजय भट्टड,राजेंद्र राठी,प्रभा मुंदडा,शिल्पा काकाणी,मंगला कलंत्री,सीमा भट्टड,अश्विनी चांडक,डॉ. मीनल पलोड यांची बिनविरोध निवड झाली.

संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अध्यक्ष अनिल बुब, अशोक बंग, रामेश्वर कलंत्री, श्रीनिवास लोया,सुरेश केला, विनोद जाजू ,अशोक झंवर,बाळकिसन धूत यांनी विषेश परिश्रम घेतले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.केदारनाथ जयनारायण बुब यांनी यशस्वीरित्या काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या