दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी, सुरगाणा, पेठ, कळवण तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास हजेरी लावल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाली होती. गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
काल सकाळपासूनच प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. दुपारी वातावरणात बदल होवून अचानक वादळीवार्यासह, विजेच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली. साधारण 15 मिनिटे हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ उडाली. शेतकर्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे काही गहू काढणीचे बाकी आहे. ते वादळी वार्याने आडवे पडले आहेत. तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहूही भिजला आहे. त्याचप्रमाणे सुरगाणा तालुक्यात आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील खिर्डी येथे शिवराम झुला मुरे यांचे घरांचे कौले वादळी वार्यामुळे उडून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे.
काही ठिकाणी विजेच्या कडाकाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर विद्युत खांब, विद्युत तारा, झाडे, कांदा चाळ, आंबा यासह शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांनी शेतात ठेवलेल्या कांदा पीक व इतर पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वार्यासह पावसाने वीज प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे दिंडोरी शहरासह काही गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
दिंडोरी शहरासह निळवंडी, पाडे, हातनोरे, वनारवाडी, मोहाडी, पालखेड बंधारा, आंबेदिंडोरी, अक्राळे, वनारवाडी, मडकीजांब, जांबुटके, निगडोळ, उमराळे, वलखेड, कोर्हाटे, लखमापूर, म्हेळूस्के, जोपूळ, मातेरेवाडी, वरखेडा, खेडगाव, सोनजांब, बोपेगाव, खडकसुकेणे, शिवनई, ओझे, करंजवण, तळेगाव दिंडोरी, इंदोरे, कोचरगाव, अहिवंतवाडी, ननाशी, देवसाने, उमराळे बु. आदी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. विजांचा कडकडाट व जोरदार वार्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा ठप्प झाला होता. अनेक भागात वीज तारा तुटल्याने अनेक गावे रात्रभर अंधारातच होती.
वणी परिसरात अवकाळी पाऊस
वणी । वार्ताहर
वणी व परीसरात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकर्यांची व नागरीकांची तारांबळ उडाली.
वणी व परीसरात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडल्याने घरांचे कौले/ पत्रे तसेच शेतकर्यांचा कांदा पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. वणी व परीसरात 4.30 वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पावसास सुरवात झाली. तसेच करंजखेड शिवारात गारांचा पाऊस झाला.
शेतकरी बांधव तसेच सर्वसामान्यांच्या घरावरील पत्रे, कौले व शेतातील झाडे कोसळली. वादळी वारा जोरात असल्याने वणी ग्रामीण रुग्णालयातील पिंपळाचे झाड विद्युत तारावर पडल्याने विज पुरवडा खंडीत झाला. त्याचप्रमाणे वणी येथे मंगळवारचा आठवडे बाजार असल्याने अनेक व्यवसाईकांचे बाजारातील छत तसेच पाल उडाले. अचानकपणे आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची धांदळ उडाली.
परीसरात करंजखेड, चौसाळे, पिंप्री-अंचला, माळेदुमाले, पांडाणे, पुणेगाव, अंबानेर, चंडीकापूर, मांदाणे, मुळाणे, संगमनेर, मावडी या गावांमध्ये जोरदार वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.वादळी वार्याचे स्वरूप मोठे असल्याने सर्वसामान्यां बरोबरच शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाली व नुकसान झाले. झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला.
पेठ तालुक्यात पाऊस
पेठ । पेठ तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळयुक्त अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा, भोपळा, टोमॅटो आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यंामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पळसन परिसरात पाऊस
पळसन । सुरगाणा तालुक्यातील पळसन परिसरात वादळी वार्यासह मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकर्याची झाली धावपळ. पळसन परिसरात काल पहाटे पासून वादळी वार्यासह मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी. पळसन, अलंगुण, देवळा, उंबरठाण परिसरात वीजाच्या कडाक्यासह पावसाच्या हजेरी शेतकरी वर्ग धास्तावला आहे. खिर्डी येथे शिवराम झुला मुरे यांचे घरांचे कौले वादळी वार्यामुळे उडून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे.
कळवण तालुक्यात पाऊस
नांदुरी । अचानक पावसाची वादळी व गारांच्या बरसातीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार म्हणजे सप्तश्रुंगी देवीचा वार आणि या दिवशी अनेक भक्त नवस स्पुर्तीसाठी नांदुरी गडावर येत असतात. आज अनेक नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांची चाग़लीच तारांबळ उडाली होती. ऐन जेवणासाठी सुरवात करत असतांना विजेच्या कडकडाटासह वादळी गारांनी झोडपूट टाकले. तसेच काही शेतकर्यांची कांदा साठविण्याची लगबग सुरु असताऩाही अनकेांची ताराबंळ उडाली असुन काही शेतकर्यांच्या काद्यांचे नुकसान झाले आहे.