सिन्नर | प्रतिनिधी Sinnar
सिन्नर शहर व तालुक्याच्या काही भागात आज (दि.2) बेमोसमी पावसाने हजेरी लावली. यावेळी धोंडबार येथे वीज पडून म्हैस ठार झाल्याची घटना घडली.
सिन्नर, विंचूर दळवी, सोनाबे, धोंडबर, डुबेरे, पांगरी, नांदुर-शिंगोटे या भागात विजांच्या कडकडाटात तुरळक पाऊस पडला. काही भागात गव्हाची काढणी सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतातच पडलेला आहे. कांदा पिकासह गव्हाचेही या पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
धोंडबारला विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यात गाराही पडल्या. यावेळी रामचंद्र सुकदेव खेताडे यांच्या मालकीच्या मुरा जातीची म्हैस वीज पडून ठार झाली. त्यामुळे रामचंद्र खेताडे याना आर्थिक फटका बसला आहे. पोलीस पाटील खेताडे यांनी घटनेची माहिती तलाठी व पशुवैद्यकीय डॉक्टरांना दिली. तलाठी गांगुर्डे व डॉ. काळे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला.