Thursday, March 13, 2025
Homeनगरमहसूल मंडळांची फेररचना केल्याशिवाय अपर तहसीलचा निर्णय नाही : ना. विखे पाटील

महसूल मंडळांची फेररचना केल्याशिवाय अपर तहसीलचा निर्णय नाही : ना. विखे पाटील

ज्यांच्याकडे मुद्दे राहीले नाहीत, ते आता जनतेला पुढे करून लढाई करीत असल्याचा माजी मंत्री थोरातांना लगावला टोला

लोणी |वार्ताहर| Loni

अपर तहसील कार्यालयाच्या संदर्भात शासन स्तरावरून जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असून महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ज्यांच्याकडे मुद्दे राहीले नाहीत, ते आता जनतेला पुढे करून लढाई करीत असल्याचा टोलाही त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. शिवजयंती सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, अपर तहसील कार्यालयाला स्थगिती मिळाल्याची बातमी ही अहिल्यानगर जिल्ह्याची नसून सोलापूर जिल्ह्यातील अ.नगर या गावाची असल्याचा खुलासा केला.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील अपर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात भूमिका मांडताना विखे पाटील म्हणाले, जनतेच्या सुविधेकरिता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे. आश्वी बरोबरच घारगाव, साकूर येथे अपर तहसील कार्यालय व्हावे, अशी मागणी पुढे आली असल्याकडे लक्ष वेधून याबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या भावनांचा कुठेही अनादर न करता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महसुली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. अपर तहसील कार्यालयावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ना. विखे पाटील म्हणाले, ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहिलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी वर्षानुवर्ष मक्तेदारी आणि दहशत निर्माण केली त्यांना जनतेने झुगारून दिले आहे. पराभव पचवता येत नसल्यामुळेच अपर तहसील कार्यालयाच्या विषयावर राजकारण केले जात असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

अतिक्रमण काढण्याच्या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, वाढत्या नागरिकरणामुळे हा प्रश्न जटील झाला आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अंतराचे निकष ठरलेले आहेत. अतिक्रमण काढून लोकांना विस्थापित करणे हा उद्देश नाही. आजही अनेक ठिकाणचा मोबदला देणे बाकी असल्याने यासाठी राज्यव्यापी धोरण घेण्याबाबत आपण पाठपुरावा करणार आहोत. शिर्डीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचे काम सुरू असून जादा दराने पुजेचे साहित्य विकणे हा सुध्दा गंभीर विषय आहे. फूल विकण्याचा अधिकार मंदिर परीसरात फक्त संस्थान सोसायटीला देण्यात आला आहे. अनधिकृत विक्री होत असेल तर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिर्डीचे नाव बदनाम होऊ नये म्हणून प्रत्येक दुकानाच्या बाहेर दरपत्रक लावण्यासाठी व लुटमार करणार्‍या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास आपण दिल्या असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

हिंदुत्वाशी फारकत घेणारे फितूर : विखे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपतींचा विचार घेवून शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या विचारानेच शिवसेनेची वाटचाल होती. पण सत्तेसाठी विचारांशी फारकत घेण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्याच्या सहकार्‍यांनी केले. हिंदुत्वाशी फारकत घेणारे खरे फितूर आहेत, अशा गद्दारांना निवडणुकीत जनतेने धडा शिकवला असल्याची टीका ना. विखे पाटील यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...