Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUPSC चे अध्यक्ष मनोज सोनींचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

UPSC चे अध्यक्ष मनोज सोनींचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तडकाफडकी राजीनामा (Resigned) दिला आहे. मनोज सोनी यांनी गेल्याचवर्षी पदभार स्विकारला होता. त्यामुळे कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे सोनी यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे (President) दिला असून अद्याप तो स्विकारला नसल्याची माहिती आहे. मात्र, सोनी यांच्या कार्यकाळाला अद्याप ५ वर्ष शिल्लक असताना त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत. डॉ. सोनी हे २०१७ मध्ये लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते. तर १६ मे २०२३ रोजी त्यांनी राष्ट्रपतीकडून शपथ घेतली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) बनावटगिरी करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरच्या कारनाम्यावरून युपीएससीवर देशभरातून सडकून टीका होत आहे. दररोज बनवाबनवी समोर येत असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का? अशी सुद्धा चर्चा आहे. मात्र, सोनी यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

एसटी महामंडळाच्या बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai एसटी महामंडळाच्या सर्व बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक आणि एलएनजी...