Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUrmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

मुंबई । Mumbai

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या कार अपघातात उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना उडवल्याचं म्हटलं जात आहे. तर एकाच मृत्य झाल्या असून दुसरा गंभीर जखमी असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

या अपघातात उर्मिला आणि ड्रायव्हरला देखील दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिला कोठारे ही यावेळी शूटिंग संपवून घरी परतत होती. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. काल (27 डिसेंबर) रात्री मुंबईतील कांदिवली परिसरातीस पोईसर मेट्रो स्थानकाजवळ तिच्या कारला अपघात झाला.

उर्मिलाची कार ही वेगात होती. कारचा वेग जास्त असल्याने ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि हा रस्त्याच्या कडेला काम करत असणाऱ्या या मजुरांना धडक दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...